नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथील एकाच कुटुंबातील चार जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येचे कारण अजूनही समोर आलेले नाही.
माळवाडी येथील ४० वर्षांचा व्यक्ती, ३५ वर्षांची त्याची पत्नी, ८ वर्षांची मुलगी आणि २ वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. आई-बाप आणि दोन मुलांचे मृतदेह फुले माळवाडीमध्ये घरात आढळून आल्याची घटना आज सकाळी घडली आहे. ४० वर्षांच्या व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. बायको आणि दोन मुलांचा मृतदेह बेडवर मृतावस्थेत आढळले. विभागीय फॉरेन्सिक टीम घटनास्थळी उपस्थित झाले आहेत.















